“शिक्षणामुळे जे योग्य, बरोबर आणि नैतिक आहे त्याचे समर्थन करणे आणि जे अयोग्य, चूक, बेकायदेशीर आणि अनैतिक आहे त्याचा विरोध करण्याची क्षमता विकसित होते.”
– महात्मा ज्योतिबा फुले

याच भूमिकेतून जागरूक नागरिक विचार मंचाच्या माध्यमातून, आपल्याला चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना प्रसिध्दी देवून त्यांचे समर्थन करायचे आहे. तसेच अयोग्य, चुकीच्या, बेकायदेशीर, अनैतिक गोष्टी व ते करणाऱ्या व्यक्ती यांना सर्वांसमोर आणून शांततेच्या मार्गाने विरोध करायचा आहे.

वैयक्तिक व कौटुंबिक प्रगती करत असताना समाज, राज्य व देश यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग व रोजगार, पर्यावरण, पायाभूत सुविधा, समान संधी, कायद्याचे राज्य व संविधानाचे पालन, विज्ञान व तंत्रज्ञान, नवीन संशोधन, राजकीय व प्रशासकीय व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी कृतिशील योगदान देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

जागरुक व जबाबदार नागरिक बनूया,
#चला बदल घडवूया….